सातारा : अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेंद्रे गावच्या हद्दीत श्रीकांत नंदकुमार महाजन (रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी त्यांच्या ताब्यातील कार (क्र. एमएच 12 एलपी 9604) भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून राजेंद्र सदाशिव शिंदे (रा. वासोळे, पोस्ट वाढे, ता. सातारा) यांचे चुलते चालवीत असलेल्या दुचाकीला धडक देऊन अपघात केला.
या अपघातात शिंदे यांचे चुलते मयत झाले असून श्रीकांत महाजन यांच्या विरोधात अपघात प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.