लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; उमेश चव्हाण यांची माहिती

by Team Satara Today | published on : 12 July 2026


सातारा : येथील लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे कृती समितीतर्फे लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण यांनी दिली.

लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, दि. 1 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच दुपारी 1 वाजता सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. जयंतीच्या अनुषंगाने परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्यासाठी रविवार, दि. 9 रोजी गोडोली नाका येथील हॉटेल लेक व्ह्यू येथे दुपारी 1 वाजता प्रसिध्द इतिहास संशोधक, लेखक व विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे जाहीर व्याख्यान होणार असून यावेळी क्रांतीदिन व आदिवासी दिन साजरा होणार आहे.

या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे उपस्थितीत राहणार असून यावेळी शिक्षक संघटनेचे महेंद्र अवघडे, ॲड. राजेंद्र गलांडे, प्रा. धनराज आवळे, पत्रकार चंद्रकांत देवरुखकर, सुरेश बोतालजी, रासपचे जिल्हाध्यक्ष रमाकांत साठे, मुंबई उच्च न्यायालयातील ॲड. आशिष राठोड, ॲड. नारायण निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे पदाधिकारी किशोर कांबळे, आशिष जाधव, सचिन मोरे, रीना भोसले, रुपिता पवार, अक्षदा काळे, वैभव गवळी, सुभाष गुंजाळ, धनाजी भोसले, माधुरी भोसले, चमेली पवार, आशिकी गुंजाळ, सविता कणसे, विमल शिंदे, कसल भोसले यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अयोध्या राम मंदिर प्रकरणाच्या निषेधार्थ साताऱ्यात रामरक्षा महाआरती; राम मंदिर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
पुढील बातमी
वाईनजीक कमाजीमाळ वस्तीतील शेतात असलेले बंदिस्त घर चोरट्याने फोडले; हजारो रुपयांचा ऐवज लंपास

संबंधित बातम्या