अयोध्या राम मंदिर प्रकरणाच्या निषेधार्थ साताऱ्यात रामरक्षा महाआरती; राम मंदिर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 12 July 2026


सातारा: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सातारा शहरप्रमुख प्रणव सावंत यांच्या वतीने सातारा शहरातील पंताचा गोट येथील पावन हनुमान मंदिरात रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शिवसैनिकांनी परिसर घोषणांनी दणाणून सोडत केंद्र व राज्य सरकारविरोधात तसेच अयोध्या राम मंदिरातील कथित भ्रष्ट ट्रस्टींच्या विरोधात घोषणा दिल्या. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महायुती सरकारविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महायुती सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला शिवसेनेच्या उपनेत्या छायाताई शिंदे, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र दादा पाटील, जिल्हा संघटिका अमृताताई पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अर्चना देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा समिंद्राताई जाधव, राजश्री पाटील, तेजस्विनी केसकर,निमिष शहा शिव आरोग्यसेना,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष समीर घाटगे, उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ धनावडे, दत्ताभाऊ नलवडे, तालुकाप्रमुख तेजस पिसाळ, रमेश बोराटे, सुनिल पवार, रवी चिकणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर धोत्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख राहुल पवार, राष्ट्रवादीचे सुनील काळेकर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक रविराज बडदरे, राजाभाऊ गुजर, उपशहरप्रमुख गणेश अहिवळे, विभागप्रमुख सुमित नाईक, मारुती वाघमारे शिवा आरोग्य सेना, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे चिटणीस शैलेश बोडके, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अतिश ननावरे, श्रीकांत पवार, निलेश जगदाळे,सुनिल भोसले, आशीतोष पारंगे, राजू नाईक,सचिन बागल, राजेश पवार,शिवाजी इंगवले, मोहित शहा, अक्षय इंगळे, प्रशांत इंगळे, अद्वैत इंगळे,नवमान बागवान, तेजस जाधव, उदय जाधव, कुणाल साबळे, अजय राठोड, अमोल खुडे यांच्यासह सातारा शहरातील हिंदू समाज, आजी-माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी राम मंदिर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यस्तरीय कलम रत्न पुरस्काराने प्रसिद्ध वक्ते, लेखक, कवी यशेंद्र क्षीरसागर सन्मानित
पुढील बातमी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; उमेश चव्हाण यांची माहिती

संबंधित बातम्या