सातारा : आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी दुपारी पाऊण ते दोन वाजण्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अक्षय उर्फ दशरथ कुमार कांबळे (रा. पंताचा गोट, सातारा) याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच पूजा रामचंद्र बनसोडे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेऊन स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी संबंधितांविरोधात पोलीस कॉन्स्टेबल यशवंत जाधव यांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास पोलीस शिपाई ताटे करीत आहेत.