बसमधून सॅक चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय दांम्पत्यावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 10 July 2026


सातारा : चोरीचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय दांम्पत्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी अनिश प्रदीप बर्गे (रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे वाकड ते सातारा असा अशोक लेलँडच्या विना नोंदणीकृत बस मधून प्रवास करीत होते. तेव्हा त्यांनी लॅपटॉप, चार्जर, पॉवर बँक व कागदपत्रे असणारी त्यांची सॅक बसमधील सामान ठेवण्याच्या रॅकमध्ये ठेवली होती.

मात्र प्रवासादरम्यान इंद्रराज प्रभू लोधी आणि सवितादेवी इंद्रराज लोधी दोन्ही (रा. अंबी, पोस्ट लतीफपूर-सुखपूर, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश) या दांम्पत्याने त्यांची सॅक चोरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधितांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील एका गावातून युवती बेपत्ता
पुढील बातमी
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या