सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी 21 वर्षीय युवती राहत्या घरातून कॉलेजला जाते, असे सांगून निघून गेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.