शेणोली बसस्थानक परिसरात ड्रग्ज प्रकरणी अल्पवयीन मुलासह दोन संशयित ताब्यात; कराड तालुका पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 10 July 2026


कराड : कराड तालुका पोलिसांनी शेणोली बसस्थानक परिसरात सापळा रचून एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका अल्पवीयन मुलासह दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून सुमारे ८० हजारांचे ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले असून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे..

संशयित अजय यशवंत कापूरकर (रा. जुळेवाडी, ता. कराड) याच्याकडून १.८९० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच दोन मोबाईल फोन, दुचाकीसह एकूण ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सातारा जिल्ह्यात पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी मोहिमेला यश मिळाले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी कराड विभागातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले होते.

त्यानुसार पोलिस निरीक्षक शीतल कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पीएसआय साक्षात्कार पाटील, सहायक फौजदार अभय तावरे, पोहवा राजेंद्र पाटोळे, धनंजय कोळी, शशिकांत काळे, संजय जाधव, विजय यादव, पोलिस हवालदार सूरज चिंचकर व महिला पोलिस कॉन्स्टेबल डेरे यांनी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाचगणीजवळ भिंगवणच्या पर्यटकाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून; संशयित चौघे जेरबंद
पुढील बातमी
दारूच्‍या नशेत घरात डोकावल्‍याच्‍या कारणातून भिगवणच्‍या पर्यटकाचा खून; मारहाण करणार्‍या संशयितांना अटक

संबंधित बातम्या