जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 09 July 2026


सातारा : पेट्रोल संपल्याने दुचाकी ढकलत घरी निघालेल्या तरुणावर जुन्या वैमनस्यातून लोखंडी हत्यार व लाकडी फळीने हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवार नाका परिसरात घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नालंदा बौद्ध वस्ती परिसरात सागर राजेंद्र भोसले (वय 19, रा. गुरुवार पेठ) हे दुचाकी ढकलत जात होते. त्यावेळी आरोपी यश सूर्यवंशी याने जुन्या वादाचा राग मनात धरून तुझी मस्ती उतरवतो, असे म्हणत लोखंडी हत्याराने त्यांच्या पाठीवर व हातावर वार केला. त्यानंतर त्याच्या दोन ते तीन साथीदारांनी लाकडी फळीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी तरुणावर उपचार सुरू असून पोलीस उपनिरीक्षक बागवान पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घरातील खर्चाच्या पैशांच्या कारणावरून दांडक्याच्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी
पुढील बातमी
न्यू विकासनगर, संगमनगर परिसरात बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; दागिने, लॅपटॉप, कॅमेरे व रोख रक्कम लंपास

संबंधित बातम्या