सातारा : वडिलोपार्जित घरातील खर्चाच्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपीने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दोघांना जखमी केल्याची घटना समोर आली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुविचार मुगुटराव पवार (वय 64, रा. वर्णे) यांच्या म्हणण्यानुसार, उपचाराच्या खर्चाबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून प्रीतम रमेश पवार (वय 27, रा. संभाजीनगर) याने सुषमा अशोक पाटील यांच्या कपाळावर दांडक्याने वार केला. त्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सुविचार पवार यांनाही मारहाण करून जखमी केले. घटनेनंतर जखमींवर उपचार करण्यात आले असून पोलीस नाईक पिसाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.