लग्नाचे आश्‍वासन देत 31 वर्षीय महिलेवर चार वर्षे अत्याचार; दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 09 July 2026


सातारा : लग्नाचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय महिलेवर तब्बल चार वर्षे अत्याचार केल्याचा तसेच तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2022 ते मे 2026 या कालावधीत अरबाज अशपाक पठाण (रा. जुना पॉवर हाऊस, पाचगणी) याने लग्नाचे आश्‍वासन देत वारंवार महिलेवर अत्याचार केले. फेब्रुवारी 2026 मध्ये करहर (ता. जावळी) येथे तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर जातीचे कारण पुढे करत लग्नास नकार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच प्रकरणात अशपाक पठाण याने कागदपत्रांच्या बहाण्याने महिलेला बोलावून तिचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे. हा गुन्हा सुरुवातीला पाचगणी पोलीस ठाण्यात झिरो क्रमांकाने नोंदवून नंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पोलीस निरीक्षक निलेश तांबे तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कारमधून कोयता व लोखंडी गजांची वाहतूक करणार्‍या एकास अटक; साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
घरातील खर्चाच्या पैशांच्या कारणावरून दांडक्याच्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी

संबंधित बातम्या