शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली; भेटीची राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

by Team Satara Today | published on : 08 July 2026


मुंबई : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार विधानभवनात पोहोचले होते. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

विधीमंडळात उच्चस्तरीय बैठक

बेळगाव सीमा प्रश्नी विधीमंडळात आज एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वाच्या बैठकीला मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवारउपस्थित होत्या. तत्पूर्वी, विधानभवन परिसरात आगमन झाल्यानंतर शरद पवारांच्या स्वागतासाठी अनेक मंत्री आमदार पोहोचले. तत्पूर्वी, शरद पवार यांचे विधानभवन परिसरात आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अनेक मंत्री आणि आमदारांनी मोठी गर्दी केली होती.

शरद पवारांनी घेतला अतिवृष्टी आणि सद्य परिस्थितीचा आढावा: शशिकांत शिंदे

शरद पवार आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या मात्र, राष्‍ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्‍हणाले, "बैठक संपल्यानंतर तिथे अनेक आमदार आणि खासदार उपस्थित होते. सर्वांना भेटावे आणि त्यांच्याशी गप्पा माराव्यात या हेतूने पवार साहेब तिथे थांबले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दालन अगदी जवळ असल्याने, साहेबांनी तिथेच बसून चर्चा केली. अधिवेशन सुरू असल्याने आमदार-खासदार यांच्याशी संवाद साधण्याचा त्यांचा मानस होता. यात कोणतेही राजकीय मार्गदर्शन नव्हते, तर फक्त राज्यातील अतिवृष्टी आणि सद्य परिस्थितीचा आढावा पवार साहेबांनी घेतला."

पक्षाचे विलीनीकरण चर्चा नाही

गेल्या काही दिवसांपासून 'असे होणार, तसे होणार' अशा सुरू आहेत. मी परत एकदा सांगतो की पक्ष विलीनीकरांची चर्चा नाही. दोन्ही पक्षाची चर्चा नाही. एनडीएबाबत जाण्याची चर्चा नाही. असेही असे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आळंदीत पावसातही हरिनामाच्या गजरात भक्तिरसाचा जल्लोष; वारकऱ्यांच्या फुगड्यांनी रंगली वारी
पुढील बातमी
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता; राज्यातील अनेक प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

संबंधित बातम्या