प्राथमिक शिक्षक संघटनांचे ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन

by Team Satara Today | published on : 07 July 2026


सातारा : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व खाजगी शिक्षक संघटनांनी गुरुवार दिनांक ९ जुलै रोजी "राज्यव्यापी शाळा बंद" आंदोलनाची हाक दिली आहे.

 कार्यरत शिक्षकांना TET परीक्षा अनिवार्यता,पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी,संचमान्यतेचे चुकीचे धोरण,BLO कामाची सक्ती या सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी या करता शासनाचे लक्ष वेधण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन करण्यात येणार आहे.याबाबतची नोटीस शासनास 30 जून रोजीच पाठवली आहे.

 शाळा बंद ठेवून सातारा  जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा द्वारे शिक्षक संघटना जाणार आहेत. हा मोर्चा तालीम संघापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सर्व शिक्षक यांनी बहुसंख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक संघटनांनी केलेले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पुढील बातमी
फलटण तालुक्यात मोठी दुर्घटना; खामगाव येथे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

संबंधित बातम्या