शाहूपुरीतील हॉटेल विहान येथे जुन्या वादातून एकाच्या खुनाचा प्रयत्न; चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 07 July 2026


सातारा : जुन्या वादातून एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी चार जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 5 रोजी शाहूपुरीतील हॉटेल विहान येथे मध्यरात्रीच्या सुमारास आर्येश चरण साळुंखे (रा. संगमनगर, सातारा) हा त्याच्या मित्रांसोबत जेवण करीत असताना जुन्या वादाच्या कारणातून प्रेम अडागळे (रा. शाहूपुरी), अण्णा माने (रा. दिव्यनगरी), आशुतोष  मुधोळकर (रा. दिव्यनगरी), प्रेम पवार (रा. शाहूपुरी) यांनी धारदार शस्त्रांनी साळुंखे यांच्यावर वार केले. यामध्ये साळुंखे हे गंभीर जखमी झाले असून याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या