सातारा : शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सदर बाजार परिसरातील लक्ष्मी टेकडी येथे एक घर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत संगीता अण्णा माने यांच्या घराची पडझड झाली असून, त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नगरसेविका रीना भणगे आणि तानाजी भणगे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
दरम्यान, नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच उपस्थित डॉक्टरांशी चर्चा करून जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.