फलटण : फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मौजे विडणी ता. फलटण गावचे हद्दीत आरोपी दशरथ बबन बनकर (वय ३८,रा. विडणी ता. फलटण) याने यातील पिडीता निर्भया हिचेवर अत्याचार केला होता. या खटल्याची अंतिम सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांच्या समोर झाली. समोर आलेला पुरावा ग्राह्य मानून न्यायाधीश यांनी आरोपी नामे दशरथ बबन बनकर २० वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या खटल्याची हकीकत अशी, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस गु.र.क्र. ३३२/२०१८ भादवि कलम ३७६,५०६, सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम कलम ४.६ (स्पेशल केस नं ११९/२०२४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उप निरीक्षक आर आर भोळ फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी करुन न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर खटला अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले फलटण यांच्या कोर्टात चालला होता. सरकारतर्फे मिलींद ओक व वैभव काटकर जिल्हा सरकारी वकील फलटण यांनी खटल्याचे कामकाज पाहीले. सदर गुन्ह्यामध्ये एकुन ०८ साक्षीदार तपासले. तसेच परिस्थीतीजन्य पुरावे व अन्य साक्षीदारांचे साक्षीवरुन तसेच जिल्हा सरकारी वकील यांचे युक्तीवाद व त्यांनी सादर केलेले उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे यांचे दाखले न्यायालयात सादर केलेने, समोर आलेला पुरावा ग्राह्य मानून न्यायाधीश यांनी दि. ४/७/२०२६ रोजी ) आरोपी नामे दशरथ बबन बनकर यास भादवि कलम ३७६ (सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम कलम ४,६, अन्वये २० वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद.
खटल्या कामी पोलीस अधिक्षक निखील पिंगळे , अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर, उप विभागिय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सुचनांनुसार राजकुमार भुजबळ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर आर भोळ, कोर्ट पैरवी अंमलदार मपोहवा नेवसे, मपोहवा कदम, पोहवा भोसले, मपोकॉ गायकवाड यांनी कामकाज पाहीले.