सातारा : प्रतिकुल हवामानामुळे नैसर्गिक आप्पतीचा धोका उद्भभवू नये यासासाठी पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने दुर्घटना टाळण्याच्या अनुषंगाने दि.6 जुलै 2026 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत असून सदर मागांवरील हलक्या वाहनांची वाहतुक ही जिल्ह्यात पावसाच्या ऑरंज व रेड अॅलर्ट वेळी पुर्णपणे बंद राहणार आहे.
तसेच रात्रीच्या वेळीस सदर मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ही पावसाळयाच्या दृष्टीने बंद करण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सदर कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून माणगांव-ताम्हाणी मार्गे पुणे-सातारा व पोलादपूर-चिपळूण-पाटण-सातारा-कोल्हापूर अशी वाहतुक वळविण्यात आली आहेत. याबाबत रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावले यांनी अधिसूचना जारी केली आहे.