वाढे फाटा येथे सराईत मोटारसायकल चोर जेरबंद; चोरीच्या चार दुचाकी सातारा शहर पोलिसांकडून हस्तगत

by Team Satara Today | published on : 03 July 2026


सातारा : सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपी युवराज आकोबा निकम (वय ५६, रा. पिंपोडे बु., ता. कोरेगाव, जि. सातारा) याला अटक करून त्याच्याकडून एकूण चार चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी मोटारसायकल चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना डी.बी. पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवली होती.

दरम्यान, वाढे फाटा परिसरात संशयित आरोपी मोटारसायकलवरून फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडील विनानंबर प्लेटची मोटारसायकल चोरीची असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. अधिक तपासात आरोपीने आणखी तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून खालील चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत :सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हा क्र. 546/2026 – हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच-11-सीपी-7364), सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हा क्र. 221/2026 – होंडा शाईन (एमएच-11-सीयू-2299). बोरगाव पोलीस ठाणे गुन्हा क्र. 347/2025 – हिरो एचएफ डिलक्स (एमएच-11-एएस-4549), तपासादरम्यान उघडकीस आलेली हिरो एचएफ डिलक्स (एमएच-11-एजे-7108)

ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे तसेच पोलीस अंमलदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, विकास मोरे, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, आशुतोष डोळस आणि सचिन आदमाने यांनी केली. पुढील तपास सातारा शहर पोलीस करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; पाटण परिसरात संततधार, महाबळेश्वरात ७० मिमी, कोयना धरणातील उपयुक्त साठा ९.३९ टीएमसीवर
पुढील बातमी
टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा - राहुल पवार, अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन सरकारला इशारा

संबंधित बातम्या