सातारा शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती बेपत्ता

by Team Satara Today | published on : 02 July 2026


सातारा : सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 रोजी खेड, ता. सातारा येथील 25 वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत, सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी 23 वर्षीय युवती राहत्या घरातून कामासाठी शेजारच्या गावात जाते, असे सांगून निघून गेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तामजाईनगर परिसरात महिलेस धमकी देत घुसखोरी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पुढील बातमी
रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू; सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद

संबंधित बातम्या