सातार्‍यात दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन दुचाकींची चोरी

by Team Satara Today | published on : 01 July 2026


सातारा : शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याच्या घटना घडल्या असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, केंजळ (ता. जावळी) येथील दिनकर तुकाराम केंजळे यांची सुमारे 20 हजार रुपये किमतीची दुचाकी जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळील रुग्णालय परिसरातून चोरीला गेली. या प्रकरणाचा तपास हवालदार मोरे करीत आहेत.

तसेच, वाढेफाटा येथील रोहन सुरेश कोरडे यांची सुमारे 40 हजार रुपये किमतीची दुचाकी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या घटनेचा तपास महिला पोलीस कर्मचारी पवार करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडोबा माळ परिसरात जुन्या वादातून चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा
पुढील बातमी
सातारा जिल्हा पोलीस दलात अंतर्गत फेरबदल; 41 अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बदल्या, अनेक ठाण्यांना नवे नेतृत्व

संबंधित बातम्या