जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीची निदर्शने

by Team Satara Today | published on : 30 June 2026


सातारा : जिल्हास्तरीय वंचिततर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र सरकार विरोधात विविध विषयावर तीव्र निदर्शने-आंदोलन पश्चिम विभागीय जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

सतत वाढविले जाणारे पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव,सतत वाढणारी महागाइ, स्मार्ट मीटरची सक्ती, अनुसूचित जाती-जमातीचा विकास निधी इतरत्र वळवून त्यांना विकासापासून वंचित ठेवणे. अशा अनेक विषयावर झालेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, युवा आघाडीचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला आघाडीचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सभासद आणि सर्व फुले-शाहू-आंबेडकरवादी कार्यकर्ते व समस्त जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माउलींच्या स्वागतासाठी सातारा सज्ज; १००० अधिकारी-कर्मचारी देणार सेवा; जर्मन हँगरमध्येही वैद्यकीय आणि फूट मसाज पथके
पुढील बातमी
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या प्रतापसिंह शेती फार्ममध्ये सुरक्षेसाठी उपाययोजना करणार - कृषी समिती सभेत निर्णय

संबंधित बातम्या