सातारा : पोलीस असल्याचे सांगून खंडणी मागितल्या प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शहूर दादाहयात बागवान (रा. सदरबझार, सातारा) यांना जयवंत शिवदास कांबळे (रा. सातारा) आणि रूप नारायण उर्फ छोटेखन संतराम गौतम (रा. सदर बझार, सातारा) यांनी रिमांड होमच्या बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात बोलावून पोलीस असल्याचे सांगून पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधितां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करीत आहेत.