सातारा : मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील साहित्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी सकाळी दहा ते दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान महादरे, दरे खुर्द, ता. सातारा येथील डोंगराच्या बाजूस असलेल्या पिसाई देवी मंदिराच्या दोन्ही दरवाजाची कुलूपे तोडून मंदिरातील पितळी घंटा, समई, धुपारती असे दहा हजार तीनशे रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.