सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील हामदाबाज गावच्या हद्दीत कोंडवे-मेढा रस्त्यालगत असलेल्या एका माळावर महिताब जब्बार शेख रा. कोंडवे, ता. सातारा हा युवक अवैधरित्या देशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 720 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.