सातारा : जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लिंब, ता. सातारा येथे जुगार घेतल्याप्रकरणी जयदीप पोपटराव यादव (रा. वाढे, ता. सातारा) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून 3840 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.