पवारवाडीचे सुपुत्र जवान तुषार भिलारे यांचा अपघातात मृत्यू; आज (बुधवारी) होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

by Team Satara Today | published on : 30 June 2026


सातारा :  पवारवाडी (ता. जावली) येथील जवान तुषार राजेंद्र भिलारे (वय 34) यांचा सुट्टीवर असताना अपघात झाला होता. त्यांचा मंगळवार दि ३० रोजी उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील असा परिवार आहे.  त्यांच्यावर बुधवार दि. 1 जुलै रोजी सकाळी 11 च्या सुमारास पवारवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. 

तुषार भिलारे हे इंडियन आर्मीमध्ये लान्स नायक या पदावर महू (मध्यप्रदेश) येथे एमसीटीई क्रोप्स ऑफ सिग्नल या युनिटमध्ये कार्यरत होते. दीड महिन्यापूर्वी ते सुट्टीवर आले होते. त्यावेळी झाडावरून पडून त्यांचा अपघात झाला. त्यांना उपचारासाठी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु एक महिन्यानंतर उपचारादरम्यान मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. 

जवान तुषार भिलारे हे 2010 मध्ये आर्मीमध्ये भरती झाले होते. ते फेब्रुवारी 2027 मध्ये सेवानिवृत्त होणार होते तत्पूर्वी त्यांचा अपघातात मृत्यू झाला. तुषार भिलारे यांच्या मृत्यूमुळे पवारवाडी ग्रामस्थ शोकसागरात बुडाले आहेत. तसेच सम्पूर्ण पंचक्रोशीत शोक व्यक्त केला जात आहे.  

जवान तुषार भिलारे यांच्यावरील अंत्यसंस्काराची तयारी झाली असून ग्रामस्थ पार्थिवाची प्रतीक्षा करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रामराजे उद्यानाचे 'संत सगुणामाता' नामकरण; फलटण पालिकेत वादळी चर्चा, २१ विषयांना मंजुरी
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला; कोयनेत १४.२४ टीएमसी पाणीसाठा, खरीप पेरण्यांना गती

संबंधित बातम्या