सातारा शहरातील यादोगोपाळ पेठ येथील एकजण बेपत्ता

by Team Satara Today | published on : 29 June 2026


सातारा : शहरातील यादोगोपाळ पेठ येथील 45 वर्षीय व्यक्ती घरातून बाहेर पडल्यानंतर परत न आल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर सुरेश रोकडे (वय 45, रा. यादोगोपाळ पेठ) हे 25 जून रोजी सायंकाळी घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडले. त्यानंतर त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र त्यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही.

याप्रकरणी त्यांचे भाऊ योगेश सुरेश रोकडे (रा. सोमवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस हवालदार खलिफा या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महादरे गावाजवळील पिसाई देवी मंदिरातून 15 हजारांची वीज केबल चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
विना 'एचएसआरपी' नंबर प्लेट वाहनांना उद्याची डेडलाईन; १ जुलैपासून होणार कारवाई

संबंधित बातम्या