महादरे गावाजवळील पिसाई देवी मंदिरातून 15 हजारांची वीज केबल चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 June 2026


सातारा : सातारा तालुक्यातील महादरे गावाजवळील जुन्या पिसाई देवी मंदिरातील वीज जोडणीसाठी टाकण्यात आलेली सुमारे 15 हजार रुपये किमतीची आरमाड केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूर महादेव निपाणे (वय 47, रा. महादरे) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंदिर परिसरातील सुमारे 150 ते 200 फूट लांबीची वीज केबल अज्ञात व्यक्तीने परवानगीशिवाय चोरून नेली. ही घटना 26 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, महिला पोलीस हवालदार चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
3 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत बांधकाम व्यावसायिकाची 6.36 लाखांची फसवणूक; महिलेवर गुन्हा
पुढील बातमी
सातारा शहरातील यादोगोपाळ पेठ येथील एकजण बेपत्ता

संबंधित बातम्या