वेटरला मारहाण करून त्रिमूर्ती बारचे नुकसान केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 28 June 2026


सातारा : बिलाच्या कारणावरून वेटरला मारहाण करून बारचे नुकसान केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मतकर कॉलनी येथील त्रिमूर्ती बारमध्ये वेटरचे काम करीत असलेले अक्षय गोरखनाथ वाघमळे (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी दारूचे झालेले बिल काउंटरवर येऊन द्या, असे म्हटल्याच्या कारणावरून साहिल गौतम रणदिवे, रोशन गुड्डू यादव, आदित्य सोमनाथ वाघमारे, रुद्र संतोष अवघडे (सर्व रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांनी वाघमारे यांना धमकी देऊन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तसेच बियरची बाटली डोक्यात फोडून त्यांना जखमी केले. त्याचबरोबर काऊंटरच्या पाठीमागील रॅक मध्ये असणाऱ्या दारूच्या बाटल्या फोडून बारचे नुकसान केले आहे.  

याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार भिंगारदेवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे पडले महाग; कारमधील दोन लॅपटॉप घेऊन प्रवासी फरार
पुढील बातमी
स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक; 2 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

संबंधित बातम्या