अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे पडले महाग; कारमधील दोन लॅपटॉप घेऊन प्रवासी फरार

by Team Satara Today | published on : 28 June 2026


सातारा : अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देण्याचा निर्णय एका तरुणाला चांगलाच महागात पडला. खेड फाटा येथे कारमधून उतरताना त्या व्यक्तीने कारमधील दोन लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरालगतच्या खेड फाटा परिसरातील टीव्हीएस शोरूमजवळ गुरुवारी (दि. 25) रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुजित संजय शिंदे (वय 31, रा. जयभवानी नगर, थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारला लिफ्ट मागितली होती. मानवतावादी भावनेतून त्यांनी संबंधित व्यक्तीला खेड फाटा येथे सोडले. मात्र, कारमधून उतरत असताना त्या व्यक्तीने कारमध्ये ठेवलेले दोन लॅपटॉप चोरून नेले आणि तेथून पसार झाला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस नाईक बोराटे पुढील तपास करीत आहेत.



 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेचा जाचहाटप्रकरणी पती, सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
वेटरला मारहाण करून त्रिमूर्ती बारचे नुकसान केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या