विवाहितेचा जाचहाटप्रकरणी पती, सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 28 June 2026


सातारा : माहेरून पैसे आणले नाहीत, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील सदरबाजार परिसरातील जय मल्हार सोसायटी येथील वैशाली विजयकुमार साठे (वय 38) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, विवाहानंतर 2014 पासून पती विजयकुमार किसन साठे, सासू सखुबाई किसन साठे आणि नणंद अनिता नितीन गस्ते (रा. शिर्शी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पतीने माहेरून खर्चासाठी पैसे आणण्याची मागणी केली.

पैसे न आणल्याच्या कारणावरून त्याने मारहाण केली. सासू व नणंद यांनीही सतत त्रास देत केलेल्या जेवणावरून टोमणे मारले. याशिवाय फिर्यादीच्या आई व भावालाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आसगाव येथील घरफोडीत 50 हजारांचे दागिने लंपास
पुढील बातमी
अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे पडले महाग; कारमधील दोन लॅपटॉप घेऊन प्रवासी फरार

संबंधित बातम्या