साताऱ्यात बनावट सोन्याच्या बांगड्या दाखवून सराफाची फसवणूक; दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 June 2026


सातारा : हॉलमार्क असलेल्या पिवळ्या धातूच्या बांगड्या खऱ्या सोन्याच्या असल्याचा बनाव करून सराफाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देगाव रोडवरील लक्ष्मी ज्वेलर्स येथे २५ जून रोजी ही घटना घडली. पल्लवी धनाजी जाधव हिने सचिन सावंत यांच्या सांगण्यावरून दोन बांगड्या मोडीसाठी आणल्या. त्या सोन्याच्या असल्याचे भासवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी सराफ उल्केश हणमंत काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पल्लवी धनाजी जाधव व सचिन सावंत (रा. सह्याद्री हिल, कोडोली, सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मल्हारपेठ पोलीस ठाण्यासमोर गोंधळ; विहे येथील मद्यधुंद व्यक्तीवर गुन्हा
पुढील बातमी
महाबळेश्वरमधील प्रसिद्ध विल्सन पॉइंटवर वनक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई; सुरक्षेचा उपाय म्हणून मुख्य प्रवेशद्वार सूर्यास्तानंतर बंद केले जाणार

संबंधित बातम्या