सातारा : मल्हारपेठ पोलीस ठाण्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ जून रोजी विकास जयसिंग भिंगारदिवे (रा. विहे, ता. पाटण) हा दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांच्या फिर्यादीवरून मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार डी. डी. घोरपडे करीत आहेत.