सातारा : सातारा महावितरण विभागामध्ये वीज जोडणे टेंडर प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार असून दलाली आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे दादासाहेब ओव्हाळ व जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांनी केली
याप्रकरणी तात्काळ न्याय न मिळाल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर येत्या पंधरा दिवसात अर्ध नग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .हा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला यावेळी कार्यकारिणीचे सदस्य पूनम निकाळजे दामिनी निंबाळकर मदन कंकाळ प्रदीप नलावडे रामभाऊ मदाडे राजेंद्र भटकर शाहरुख शेख महेश पवार विकास जाधव अभिजीत शिंदे सुरज गाडे वंदना सगळे व शितल बल्लाळ उपस्थित होते .
महावितरणच्या कारभाराचा पंचनामा करताना दादासाहेब ओवाळ म्हणाले महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन बदला होत नाहीत शासनाच्या एनएससी फंडातून कामे होत असताना कार्यकारी अभियंता मंजुरीसाठी अंदाजपत्रकाच्या 50% रक्कम मागितली जाते व नकार दिल्यास निविदेला मंजुरी दिली जात नाही .मर्जीतल्या ठेकेदारांनाच टेंडर दिले जाते लोकप्रतिनिधीचे नाव सांगून कर्मचाऱ्यांना चुकीचे काम करण्यास दबाव आणला जातो .
निलेश पवार या खातेदाराने महावितरण कडे 100 केवीचा डीपी मागितला असता त्याचा डीपी दुसरीकडे हस्तांतरित करण्यात आला तसेच शंभर केवीच्या डीपीची मागणी केली असता 60 केबी चा डीपी खातेदाराला दिला जातो असे अक्षम्य प्रकार या खात्यामध्ये सुरू आहेत साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी दलित वस्ती नसताना तेथे मंजूर करण्यात येऊन त्याची कामे करण्यात आलेली आहेत .या सर्व गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अन्यथा पंधरा दिवसात महावितरण कार्यासमोर अर्ध नग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे