लोंबकळणाऱ्या तारा, उघडे डी.पी. याबाबत जिल्ह्यात सर्वत्र सर्वेक्षण करुन योग्य ती कार्यवाही करावी - अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार

by Team Satara Today | published on : 25 June 2026


सातार  :  महावितरणने जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठाकाणी तसेच गाव पातळीवर सर्व्हेक्षण करुन धोकादायक ठरणाऱ्या विद्युत वाहिन्या, उघडे असेलेले डी. पी., फ्‌यूज बॉक्स सुस्थितीत करावे. तसेच मान्सून पूर्व कामे तातडीने पूर्ण करून येत्या 8 दिवसात त्याचा अहवाल सादर कारावा अशा, सूचना अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिल्या. 

ग्राहाक संरक्षण परिषदेची बैठक आज अपर जिल्हाधिकारीय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळीत्यांनी या सूचना दिल्या. यावेळी बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी व ग्राहक संरक्षण परिषदेच्या सचिव वैशाली राजमाने, ग्राहक संरक्षण परिषेचे सदस्य, व संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना  उत्तरे देताना अपर जिल्हाधिकारी श्री. इनामदार म्हणाले, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने करावयाची सर्व कामे प्राधान्याना पूर्ण करावीत. बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील अपूर्ण असलेली गटारे ग्रामपंचायत विभागानेतातडीने पूर्ण कारीवत व पावसाळ्यात याठिकाणी पाणी साठणार नाही याचीखात्रीकरावी. सातार शहारात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या  यावर रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करण्यासाठी नगरपालिका, शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परीवहन विभाग यांनी एकत्रित बैठक घेऊन याविषयी तोडग काढण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

रिक्षा संघटना आणि ग्राहक परिषद यांची संयुक्त बैठक परिवहन विभागाने घ्यावी व शहरातील सर्व रिक्षांना मीटर बसवण्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. इनामदार यांनी दिल्या. बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित विभागांनी सादर करावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय
पुढील बातमी
पाचगणी परिसरात अचानक कारवर दोन झाडे व विद्युत तारा कोसळल्‍या; सुदैवाने तरूण बचावला, धोकादायक वृक्षांचा प्रश्‍न ऐरणीवर

संबंधित बातम्या