अविनाश शिळीमकर साताऱ्याचे नूतन डीवायएसपी; गृह विभागाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

by Team Satara Today | published on : 25 June 2026


सातारा : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये साताऱ्याचे नूतन डीवायएसपी म्हणून अविनाश शिळीमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील इतरही काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

​नूतन डीवायएसपी अविनाश शिळीमकर यांनी यापूर्वी लोणंद येथे कार्यभार सांभाळला असून, पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) पोलीस निरीक्षक म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यामुळे सातारा आणि पुणे परिसरात त्यांचा चांगला जनसंपर्क आणि कामाचा मोठा अनुभव आहे.

​याच अंतर्गत पुणे येथून कृष्णकुमार जाधव यांची सातारा पोलीस उपअधीक्षक मुख्यालय येथे बदली झाली आहे. तर पोलीस प्रशिक्षण दौंड येथून शिरीष शिंदे यांची सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखा येथे बदली करण्यात आली आहे. दरम्यान, साताऱ्याचे डीवायएसपी राजीव नवले यांची गुन्हे अन्वेषण पुणे येथे, अरुण देवकर यांची सोलापूर शहर, राजेंद्र मस्के यांची गुन्हे अन्वेषण पुणे आणि यशवंत नलवडे यांची नागपूर येथे बदली झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मार्डीमध्ये शेळीचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या नातवाचा आणि त्याला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या आजीचाही विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू
पुढील बातमी
वर्धनगड किल्ल्यावरून महाकाय दगड लोकवस्तीत कोसळला; ग्रामस्थांचा वनविभागावर तीव्र संताप

संबंधित बातम्या