सातारा : करंजेपेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल मध्ये रविवार दिनांक 21 जून रोजी 'जागतिक योग दिवस' अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन संस्था सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.
कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती शिवाजीराव मलदोडे (उपशिक्षणाधिकारी जि. प. सातारा), ज्योती काटकर व तृप्ती नौगन (समाज कल्याण निरीक्षक) पी.डी.पाटील (माजी विभागीय अधिकारी व आजीव सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा) जाधव प्रसिद्ध व्यावसायिक, तसेच यादव साहेब (पत्रकार सकाळ वृत्तपत्र समूह सातारा)आणि संस्था सचिव तुषार पाटील यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी योगाचे महत्त्व कथन करण्यात आले.सुजाता कदम व सुनिता बोराटे या योगशिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अमरसिंह वसावे,पर्यवेक्षक रवींद्र निकम, क्रीडाशिक्षक यशवंत गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.