सातारा : आजारपणाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत उत्तम कणसे (वय 26, मूळ रा. खटाव, जि. सातारा, सध्या रा. कोडोली, ता. जि. सातारा) हा युवक काही काळापासून आजारी होता. दीर्घकाळ सुरू असलेल्या आजारामुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त होता. दि. 21 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात डॉ. प्रतिक गावडे यांनी पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक तपास पोलीस हवालदार पाटोळे यांनी केला असून पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.