महागाव हद्दीतील कृष्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 23 June 2026


सातारा : तालुक्यातील महागाव हद्दीतील कृष्णा नदीपात्रात पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव अंकुश कांबळे यांचा दि. 22 रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीच्या पात्रात पडून बुडाल्याने मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत महागावचे पोलीस पाटील शिवाजी सर्जेराव चव्हाण (वय 57) यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धनगरवाडी, ता. सातारा येथील युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद
पुढील बातमी
आजारपणाला कंटाळून खटावच्या युवकाची आत्महत्या

संबंधित बातम्या