व्यंकटपुरा पेठ परिसरात एका घरातून ४३ हजारांची रोकड गायब; घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय

by Team Satara Today | published on : 22 June 2026


सातारा  : व्यंकटपुरा पेठ परिसरातील एका घरातून ४३ हजार ९०० रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, २० जून रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या कालावधीत घरातील दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये कपाटात ठेवलेली रोकड गायब झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत स्मिता दीपक भोसले (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुषमा सचिन जाधव (रा. मोरे कॉलनी, शाहूपुरी) यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार खलिफा करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशवाडी परिसरात अवैध मद्यवाहतुकीवर पोलिसांची कारवाई; दुचाकीसह मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
कोंडवेत ४४ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; अकस्मात मृत्यूची नोंद

संबंधित बातम्या