सातारा : घरफोडी करणार्या डिलेव्हरी बॉय असलेल्या संशयितास अटक करण्यात सातारा शहर डी.बी. पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील सुमारे 13 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ओंकार नरेश बाबर (वय 30 वर्ष रा. सध्या दिव्यनगरी, पार्टे कॉर्नरच्या पाठीमागे, शाहूपुरी, सातारा. मूळ राहणार उडतारे, ता. वाई, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर येथील आमराई कॉलनी तील शिवालय या अपार्टमेंटमध्ये दि. 15 रोजी दिवसा एका बंद घराचे कुलूप तोडून एका अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने चोरी केले होते. या चोरीबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी.बी. पथक या आरोपीचा शोध घेत होते. आरोपी बाबत माहिती घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे एका संशयित आरोपीचे नाव समजून आले. तो चोरटा असल्याने व त्याचा निश्चित राहण्याचा ठाव ठिकाणा नसल्याने त्याच्या शोधासाठी पोलीस विविध ठिकाणाहून माहिती प्राप्त करीत होते. परंतू आरोपीबाबत निश्चित माहिती मिळून येत नव्हती. सातारा शहर डी.बी. पथकाचे एक पथक दोन दिवसापासून त्याच्या मागावार होते.
हा चोरटा पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनाने जात असताना डी.बी. पथकाने त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी डी.बी. पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास पकडून ताब्यात घेतले. त्यास पोलीसांनी अटक करून न्यायालयामध्ये हजर केले असता त्याची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली होती. रिमांडमध्ये त्याने संबंधित गुन्हा केल्याची कबूली दिलेली आहे. या चोरट्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल, गुन्हा करताना वापरलेले वाहन, मोबाईल फोन असा एकुण 13 लाख 1 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. हा अटक आरोपी हा डिलेव्हरी बॉय असून डिलेव्हरी देताना बंद घरे हेरुन घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. हवा. निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ.तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सचिन आदमाने यांनी तसेच सायबर विभागाचे अंमलदार प्रशांत मोरे, रामदास भास्करवाड यांनी सहभाग घेतला.