कराड : पुणे-बंगळुरु महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत कराड येथील कोल्हापुर नाक्यावर उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली आहे. उड्डाणपुल कामामुळे दोन वर्षाहून अधिक काळ महामार्गावरुन प्रवास करणाऱ्याना त्रास सोसावा लागला. कोल्हापुर नाका ते नांदलापुर दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. पुलावरून उद्या रविवारपासून हलकी चार चाकी वाहणे सोडण्यात येणार आहेत त्याचे दोन दिवस चाचणी घेतल्यानंतर सुरक्षेच्या व उड्डाणपुलाच्या कामाची देखरेख करून पुन्हा हा पूल सर्व वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याचे महामार्ग विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्या पुलावरून उद्या रविवारपासून चार चाकी हलकी वाहने सातारा ते कोल्हापूर या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर धावणार आहेत दोन दिवस चाचणी घेऊन नंतर कामाचा आढावा घेऊन हा पुल सर्व वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याचे महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. पुणे-बंगळुरु महामार्गातंर्गत सातारा ते कागल या महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत सर्वात मोठा असलेला कऱ्हाडचा कोल्हापुर नाका ते नांदलापूर दरम्यान होणारा उड्डाणपुल हा २९.५ मीटर रूंद, ३.४७ किलोमीटर लांब असुन तो ९२ पिलरवर उभारण्यात आला आहे.
उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षापासुन करण्यात येत होते. मात्र ते काम लांबवल्याने तीनदा मुदतवाढ देण्यात आली. तरीही काम सुरुच होते. त्यामुळे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना वाहतुक जामचा मोठा फटका सहन करावा लागला.
दर शनिवार, रविवारी तर तब्बल दोन-तीन तास वाहतुक जाम होत होती. त्यामुळे वाहनधारक अक्षरशः वैतागले आहेत. सध्या या उड्डाणपुलाचे काम पूर्ण वाकडे आले आहे. पुलावरून उद्या रविवारपासून हलकी चार चाकी वाहणे सोडण्यात येणार आहेत त्याचे दोन दिवस चाचणी घेतल्यानंतर सुरक्षेच्या व उड्डाणपुलाच्या कामाची देखरेख करून पुन्हा हा पूल सर्व वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याचे महामार्ग विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले.