राज्यात २३ जूनपासून मान्सून सक्रिय होणार; कोकणात मुसळधार, विदर्भात मात्र उष्णतेची तीव्र लाट

by Team Satara Today | published on : 20 June 2026


पुणे : राज्यात २३ जूनपासून मान्सून सक्रिय होत आहे. प्रामुख्याने कोकणात २२ ते २५ जूनदरम्यान मुसळधार, तर विदर्भात मात्र उष्णतेची तीव्र लाट सक्रिय होत आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

राज्यात गत १३ दिवसांपासून अडखळलेला मान्सून मंगळवारपासून (दि. २३ जून) सक्रिय होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. राज्यात २२ ते २५ जूनदरम्यान कोकणात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भात याच कालावधीत उष्णतेची प्रखर लाट राहणार असल्याने उष्णलाटांचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

असे आहेत अलर्ट - पावसाचा यलो अलर्ट (दि. २२ ते २५ जून) : ठाणे, मुंबई, कोल्हापूर (घाट), कोल्हापूर शहर, सिंधुदुर्ग (२२ ते २५), पुणे शहर (२४, २५), सातारा, सांगली (२३ ते २५), सोलापूर (२२, २३), छ. संभाजीनगर (२४, २५), परभणी (२५)

उष्णतेचा ऑरेंज अलर्ट (हीट वेव्ह दि. २२ ते २५ जून ) - अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
टोलप्रश्नी कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणणे मांडण्याचे आदेश; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या याचिकेवर सुनावणी
पुढील बातमी
कराड येथील कोल्हापुर नाक्यावर उड्डाण पुलाची आजपासून (रविवार) चाचणी; हलकी चार चाकी वाहणे सोडण्यात येणार

संबंधित बातम्या