महामार्गावरील खोडद परिसरात डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 20 June 2026


सातारा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खोडद परिसरात झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभगाव बसथांब्याजवळ डंपरने मोपेडला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील शालन जयसिंग ढाणे (वय 62, रा. पाडळी) या गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांचे पती तुकाराम ढाणे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी चालक गोरखनाथ जगन्नाथ येलमर याच्याविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूनगर परिसरातील एका निवासी फ्लॅटचे कुलूप तोडून दागिने व रोकड लंपास
पुढील बातमी
खिंडवाडी गावाजवळ महामार्गावर कारच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

संबंधित बातम्या