सातारा : लिंब गावातील एका बैठकीदरम्यान अपंगत्वाची खिल्ली उडवून सार्वजनिकरित्या अपमान केल्याच्या आरोपावरून एका महिलेविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत आपले मत मांडत असलेल्या महिलेची नक्कल करून अपमानास्पद हावभाव करण्यात आले. तसेच अवमानकारक शब्दप्रयोग करून सार्वजनिकरित्या अपमान करण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.