सातारा : शाहूपुरी भागातील १६ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ जून रोजी सकाळी सातच्या सुमारास ही मुलगी राहत्या घरातून निघून गेल्याचे निदर्शनास आले. अल्पवयीन मुलीला फूस लावून पालकांच्या ताब्यातून दूर नेल्याची तक्रार तिच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध स्तरांवर तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करीत आहेत.