सातारा : सार्वजनिक रस्त्यावर परवानगीशिवाय वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करून वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रतापगंज पेठेतील राधिका चौक परिसरात १६ जून रोजी रात्री उशिरा संबंधितांनी रस्त्यावर वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. रात्रीच्या वेळेतील फटाकेबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी जयेश लकेरी, विजयश लकेरी, तुषार जाधव, श्रीधर हडपद, कैलास लकेरी आणि हरीश लकेरी (सर्व रा. सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार भाकरे करीत आहेत.