मधमाशा पालन करणा-यांना मिळणार 50 टक्के अनुदान योजनेचा लाभ

by Team Satara Today | published on : 16 June 2026


सातारा  : राज्य शासनाने मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी मध केंद्र योजना सुरू केली आहे. ही योजना राज्यात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येते.

या योजनेअंतर्गत मधपेट्या साहित्य व मधमाशा वसाहती घेण्यासाठी 50 टक्के स्वगुंतवणूक व 50 टक्के शासन अनुदान साहित्य स्वरूपात तसेच 10 दिवसाचे निशुल्क मधमाशापालन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकरी यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी निसार तांबोळी यांनी केले आहे.

या योजनेचा ज्यांना लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, प्रिती हॉटेल कॉम्प्लेक्स, अजंठा चौक, सातारा. दूरध्वनी क्र. (02162)246016 येथे कार्यालयीन वेळेत अर्जासाठी संपर्क करावा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरातून दोन युवती बेपत्ता
पुढील बातमी
मध व्यवसायाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण शक्य - रवींद्र साठे, मुंढेवाडी येथे मधुबन या ब्रँडचे शॉपीचे उद्घाटन

संबंधित बातम्या