सातारा : बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीनाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी दुपारी चार ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान बाल निरीक्षण गृहातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.