मद्यप्राशन करून कार चालवणार्‍याची दुचाकीला धडक; पिता-पुत्री जखमी

by Team Satara Today | published on : 15 June 2026


सातारा : क्षेत्रमाहुली परिसरात भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने वडील आणि त्यांची सात वर्षीय मुलगी जखमी झाली. अपघातावेळी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशाल विष्णु शिंदे (वय 36, रा. सोनगाव) हे मुलगी शिवन्यासह दुचाकीवरून घरी परतत होते. 13 जून रोजी सायंकाळी क्षेत्रमाहुली बसस्टॉपजवळ अल्टो कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विशाल शिंदे यांच्या हाताला व खांद्याला दुखापत झाली, तर शिवन्याच्या डोक्याला आणि कमरेला मार लागला. फिर्यादीवरून रोहित सुरेश रजपूत (रा. कोरेगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस हवालदार कारळे तपास करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ठिबक पाईपच्या कारणावरून वाद विकोपाला; तुकाईवाडी शिवारात शेतकर्‍यावर विळ्याने वार
पुढील बातमी
फत्त्यापूर येथील एकाची स्प्लेंडर दुचाकीची चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या