सातारा : तुकाईवाडी शिवारात ठिबक सिंचनाच्या पाईपवरून सुरू झालेल्या वादातून एका शेतकर्यावर विळ्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप दादासाहेब अवताडे (रा. कोपर्डे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेतातील पाईप हलविल्याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून संदीप शिरीष वाघ याने शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील विळ्याने अवताडे यांच्या डाव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.